दिली सूट करत आहे लूट?
पोलीस मुकदर्शक.. प्रशासनच्या महसूल ला रेती घाट धारकांचा डच्चू.. रात्रीस खेळ चाले
रेती घाटावर रात्रीस खेळ चाले! अवैध रेती उपसा
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात एन बोथला, हिवरा, आर्वी आणि कुलथा या चारही रेती घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीबी आणि पोकलन मशीनच्या सहाय्याने अवैध रेती उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जिल्हा प्रशासनाने काही रेती घाटावर उरलेला स्टॉक उचलण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्या संधीचा फायदा घेत पुन्हा रेतीचा नदी पात्रातूनच उपसा करण्यात येत असल्याने प्रशासन झोपेत आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाचीही मूक संमती असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे या ठिकाणाहून रेती उचलण्यात रेती घाट धारकांना कुठलीही अडचण निर्माण होत नाही.
या अवैध उपसामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडत आहे. या ठिकाणी नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.