अवैध सावकारीचा मकडीजाळ…घेतले कर्ज?… झाले त्रस्त…. बापरे व्याज दर हो की काय? सहाय्यक निबंधक कार्यलयात करा तक्रारी….

269

अवैध सावकारीचा मकडीजाळ…घेतले कर्ज?… झाले त्रस्त…. बापरे व्याज दर हो की काय? सहाय्यक निबंधक कार्यलयात करा तक्रारी….

चंद्रपूर – अवैध सावकारी चा चंद्रपूरात चांगलाच धंदा फोफवाला आहे. नियमाप्रमाणे सावकारी धंदा करणारे काही सावकार च शिल्लक उरले आहे. तेही सावकार चेक द्वारे च अकाउंट मध्ये पैसे देतात आणि त्यांचा मासिक महिना दर 1.5 ते 2 टक्के असतो आणि त्यांना रीतसर व्याज दराची पावती पण दिल्या जाते. पण अलीकडे व्याज दराची पद्धतच बदलली आहे. गरजे च्या पोटी मिळेल त्या व्याज दर मध्ये पैसे उचलून शेवटच्या घटके पर्यंत व्याज धारकांचे पैसे भरून भरून तंगून जाणारे शेवटी मग त्याची परिस्थिती च नसते तो पर्यंत तो व्याज वाला त्या कडून आपली मूळ रक्कम वसुल करूनही पाच ते दहा पट त्याकडून पैसे घेऊनच घेतो असे अनेक उदाहरण चंद्रपूरात घडले आहे. मग आणखी पैशाचा तगादा लावल्याने व तो कर्जधारक देत नसल्याने त्याला मारहाण, शिवीगाळ त्यासोबत च वादविवाद होऊन आणखी प्रकरण चिगळतच जाते पण कर्ज धारक त्याचे काहीही करू शकत नाही. मार्केट मध्ये विशिष्ट व्याज धारक सध्या आपला तुकूम, बंगाली कॅम्प, दुर्गापूर, रामनगर, जठपुरा परिसर, बाबुपेठ, पठनपुरा, आणि गोल बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात 10,20आणि 25टक्के व्याजाने दराने( मासिक )आणि काहीतर हफ्त्या ने पैसे देऊ न राहले आहे. त्यांना कुणाची परवानगी लागतंच नाही. यांच्याकड़े कुठलाही सावकारी परवाना नसताना सुद्धा आपले व्याजधारकांनी वसुली जाळे पसरवलं आहे. मरता क्या नही करता म्हणून कर्जधारक यांचा बळी ठरत आहे. यामध्ये काही महिलांचे बचत गट सुद्धा 5%प्रमाणे मार्केट मध्ये पैसे वाटत आहे महिलांच्या आर्थिक परिस्थिती त सुधारणा झाली पाहिजे त्याकरिता बचत गट स्थापन केले पण त्यांचाही काही लोभ सुटेना झाला आहे. दुर्बल असलेल्या व्यक्तीला मदत व्हाही आणि त्यातून त्या महिलेने आर्थिक सक्षम होऊन एखादी व्यवसाय थाटावा हा त्या मागचा मुख्य उद्देश आहे. परंतु यांची दिशा च उलटी होत चालली आहे.
सावकारी च्या नावावर फोफावत चाल लेली अवैध व्यवसायायची साखळी आणि गुंडागर्दी वर ताबडतोब सहकार निभंधक खात्याने आणि पोलिसांनी कठोर पावले उचल ल्यास अनेक अवैध सावकार च्या धंध्याला आळा बसेल आणि कर्ज धारकारची होणारी लूट थांबल. जर तुम्हाला ही कुठला अवैध सावकार त्रास देत असेल किंव्हा धमकी देत असेल तर त्यातून तुम्ही घाबरून न जाता त्याची थेट सहकार निंभंधक कार्यालयाला प्रशासकीय भवन येथे तक्रार करा. यावर हा विभाग कठोर कारवाई करणार.