राज्यातील महाराष्ट्र पोलीस कॅडर च्या dysp /Acp /sdpoच्या पदोन्नती संदर्भात राज्य सरकार कडून अन्याय..

446

राज्यातील महाराष्ट्र पोलीस कॅडर च्या dysp /Acp /sdpoच्या पदोन्नती संदर्भात राज्य सरकार कडून अन्याय

IPS कॅडर ला प्राध्यान्यामुळे राज्यातील पदोन्नती रखडली

राज्यातील महाराष्ट्र पोलीस कॅडर च्या dysp /Acp /sdpo च्या पदोन्नती संधर्भात राज्य सरकार कडून अन्याय..IPS कॅडर ला प्राध्यान्या मुळे राज्यातील पदोन्नती रखडली….

सुशांत घाटे -20 डिसेंबर 2023

-राज्यात अनेक डी वाय एस पी, ए सी पी, एस डी पी ओ अधिकाऱ्यांच्या पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक होण्याचा कार्यकाळ होऊन सुद्धा त्यांना अद्याप पदोन्नती देण्यात आली नाही. दहा वर्षाचा कार्यकाळ होऊन सुद्धा ते अधिकारी आपल्या पदोन्नती ची राज्य सरकार कडून वाट बघत आहेत.नुकत्याच राज्य सरकारने 10 IPS कॅडर च्या अधिकाऱ्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी पदी नियुक्ती केली. त्यामुळे राज्यातील इतर पोलीस उपविभागीय अधिकारी यांची होणारी पदोन्नती तसेच थेट MPSC चे उपविभागीय अधिकारी यांच्या अडचणीत वाढ़ होणार आहे.

 

पूर्वी IPS अधिकाऱ्यांना थेट अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती द्याचे मात्र आता dysp /acp पदी नियुक्ती देत असल्याने महाराष्ट्र कॅडर मधील अधिकाऱ्यांना पोस्टिंग पदोन्नती ची वाट बघत राहावे लागत आहे. पदोन्नती चा कार्यकाळ पूर्ण होऊन सुद्धा त्यांना उपेक्षित राहावं लागत आहे.2017पर्यंत राज्य सरकारच्या गृह खात्याने याच अधिकाऱ्यांच्या कार्यकाळानुसार व्यवस्तीत रीत्या पदोन्नती ची यादी जाहीर केली. मात्र गेल्या सहा वर्षा पासून याच पदोन्नती ला वीराम लागल्याचे दिसत आहे.

 

बोटावर मोजण्या इतक्याच राज्य सरकारकडून पदोन्नती करण्यात आली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना पदोन्नती रँक चा वेतन (ग्रेड )तर मिळत आहे पण पदोन्नती (कालबद्ध) रखडलेली असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.या अधिकाऱ्यांना पदोन्नती चे वेतन दिले जातात पण पद दिले जातं नाही.IPS अधिकाऱ्याच्या थेट पोस्टिंग मुळे राज्यातील मपोसे अधिकाऱ्यांना लांबनीवर ठेव्हण्यात आल्याचे ही सध्या बोलण्यात येत आहे.जवळपास 25 ते 30 sdpo /acp /dysp 2014 च्या बॅच चे महाराष्ट्र कॅडर चे (mpsc)त्यांना 10वर्ष होऊनही पदोन्नती देण्यात आली नाही. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक /पोलीस उपायुक्त या पदावर राज्य सरकारच चा पदोन्नती देण्याचा मानस दिसून येत नाही.

 

यापूर्वी राज्य शासनाच्या या अधिकाऱ्यांना सहा सात वर्षात पदोन्नती मिळत होती पण आता दहा वर्ष लोटूनही पदोन्नती चा मार्ग काही राज्य सरकारला सापडेनाचा झाला आहे.त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष घालावे आणि पदोन्नती चा मार्ग सरळ करावा ही अधिकऱ्यांची अपेक्षा लागली आहे.