महाराष्ट्र पोलिसात 10 नवीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पदस्थापना

412

महाराष्ट्र पोलिसात 10 नवीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पदस्थापना

 

नागपूर, दि. 15 डिसेंबर 2023: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथील “Phase-II Training of Basic Course (74 RR)” हे संस्थात्मक प्रशिक्षण पूर्ण करुन, महाराष्ट्र संवर्गात दिनांक 18.12.2023 रोजी रुजू होणाऱ्या 10 परिवीक्षाधीन भा.पो.से. अधिकाऱ्यांची पदस्थापना केली आहे.

 

या पदस्थापनानुसार, श्री. कमलेश मीणा यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, केज, जि. बीड या पदावर, श्री. चव्हाण राहुल लक्ष्मण यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगांव, जि. वर्धा या पदावर, श्रीम. अन्नपूर्णा सिंह यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा, जि. जळगाव या पदावर, श्रीम. साटम नवमी दशरथ यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट, जि. अकोला या पदावर, श्री. अनमोल मित्तल यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, जि. चंद्रपूर या पदावर, श्री. बडेली चंद्रकांत रेड्डी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर, जि. लातूर या पदावर, श्री. गुंजाळ सुरज भाऊसाहेब यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगांव छावणी, नाशिक ग्रामीण या पदावर, श्री. म्हस्के अनिल रामदास यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर या पदावर, श्री. चिलुमुला रजनीकांत यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा, जि. यवतमाळ या पदावर आणि श्रीम. किरितिका सी. एम. यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज, सोलापूर ग्रामीण या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.