जगन- सुदर्शनची जिल्ह्यात धूम! महिन्याकाठी 50 लाखाची अवैध दारू विक्रेत्याकडून वसुली?

1065

चंद्रपूर -गडचिरोली-
“दो घुट मुझे भी पिलादे शराबी,
देख फिर होता है क्या..” हे गाण्याचे जर उच्चार तोंडात आले की मद्याचे आंबट शौकीन त्याचा भरघोस आनंद घेतात. पण जिल्ह्यात सध्या डुप्लिकेट दारू चा पुरवठा होत असल्याचे विश्वसनीय सूत्रां द्वारे माहिती मिळाली आहे. मध्यप्रदेश, गोवा, दमण, हरियाणा (स्कॉच ) साठी महिन्याला 5 मोठे ट्रक दारू घेऊन उतरतात आणि जंगल भागातून ट्रक उभे करून छोट्या गाड्या मार्फत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पुरवठा करतात.हे पुरवठा करणारे सर्व बाहेरील भागाचे आहे. जिल्ह्यात सध्या अवैध दारू विक्री जोमात सुरु असून जगन आणि सुदर्शन ची जोडी धूम मचवत आहे. महिन्याकाठी जवळपास 50 लाखाची अवैध वसुली हे करीत आहे. जगन मामा एका बॉर्डर ची धुरा सांभाळत आहे तर सुदर्शन चक्र पूर्व दिशेने भरकटत आहे. जिल्हा पिंजून पिंजून लाखो ची अवैध वसुली मध्ये जगन ला नव वर्षे पूर्ण होण्यास आले आहे. ड्राइवर पदा वर असलेल्या जगन ला जसे अधिकारी च समजावे लागेल जगन नी जुनोना येथे आठ एकर जमिनीचा पठ्ठा घेऊन फार्म हाऊस तैयार केले आहे. सोबतच वडगाव रोड ला एक बार पण थाठले आहे. चंद्रपूर जिल्हा ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखल्या जाते तर सोन्याची झळाळी राहणारच. जगन मामा नी एस क्रॉस चारचाकी वाहणाला वसुली साठी घेतले आहे. आपली ड्युटी पूर्णतः जगन आपल्या खासगी वाहनानेच करतो. त्यासोबतच चक्रधारी सुदर्शन ही पूर्व दिशेची पूर्ण वसुली करत आपली जवाबदारी पार पाडतो चक्रधारी सुदर्शन ने दाताळा येथे पंधरा एकर जमीन विकत घेतली आहे.वसुलीची रक्कम जमा करून ही रक्कम टप्या टप्या ने महिन्या काठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहचवली जाते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात येणारी दारू वर अंकुश लावन्या करीता उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यासाठी त्यांनी गडचिरोली येथे अधिकाऱ्यांच्या कानउघडनी पण केली होती. उत्पादन शुल्क विभाग नेमकं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कुठली जवाबदारी पार पाडतात हा प्रश्न भेडसावत आहे.