वर्धा, नागपूर एल सी बी गुन्हेगारी अवैध धंद्याला रोखण्यात सुपरहिट.. चंद्रपूर एल सी बी फ्लॉप ‼️

1464

वर्धा, नागपूर एल सी बी गुन्हेगारी अवैध धंध्याला रोखण्यात सुपरहिट..
चंद्रपूर एल सी बी फ्लॉप ‼️

नागपूर /वर्धा/चंद्रपूर – विदर्भात नागपूर ग्रामीण व वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हेगारी व अवैध धंध्यावर चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. वर्धा जिल्ह्याचा प्रभार सांभाळताच पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी गुन्हेगारी आणि अवैध धंधे यांना काटकोरपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तसेच सायबर क्राईम ला त्यांनी सूचना केली होती. वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आव्हनाला म्हणजे दारू विक्री आणि तस्करीला पूर्णतः खंडित केले आहे. नरुल हसन यांचे नाव ऐकताच गुन्हेगारी टोळी पूर्णतः शांत झाली आहे. गेल्या वर्षभरात मोठं मोठ्या कारवाई करीत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदीच विराजमान होताच हर्ष पोद्दार यांनी त्वरित स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष शाखा बनवत अवैध व्यवसायाला चांगलाच आळा घातला आहे. नागपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृवात हत्या, दरोडे तसेच इतर गुन्हेगारी मध्ये असणाऱ्या आरोपीना तात्काळ कारवाई करीत जेरबंद केले आहे. अवैध व्यवसायाला आळा घालण्यात त्यांना चांगले यश आले आहे.
चंद्रपूर पोलीस अधीक्षक पदी नियुक्त झालेले रवींद्रसिंह परदेशीं यांनी अवैध व्यवसायाला चाप बसवण्यासाठी सूचना केल्या होत्या मात्र त्यांच्या सूचना ह्या फक्त सूचनाच राहिल्या चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी चा वाढतच चाललेला आखडा आणि अवैध धंद्याला आळा घालण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला अपयश आले आहे. जिल्ह्यात सुंगधित तंभाखू, कोळसा चोरी, दारू तस्करी, मटके अड्डे, घरफोड्या, जुगार अड्डे, भंगार चोरी, रेती तस्करी, जनावर तस्करी, असे अनेक व्यवसाय चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असून त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे कुठलेच नियंत्रण राहले नाही. चक्क स्थानिक गुन्हे शाखेचाच एक पोलीस कर्मचारी हा घरफोडी प्रकारणात अडकलेला आहे. पोलिसांनाच पोलीस स्टेशन मध्ये धक्काबुक्की चा प्रकार घडत आहे. त्यामुळे सुरक्षित कोन हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पोलीस अधीक्षक यांची विशेष शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेलाच जर अवैध व्यवसायला चाप बसवता येत नसेल तर त्याला काय म्हणावे हे उत्तर त्यांनी स्वतःच शोधण्याची गरज आहे.