**पुन्हा एक घरफोडी, चोरांचा हैदोस!**
**चंद्रपूर, दि. ५ डिसेंबर २०२३** – चंद्रपूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहर पोलीस स्टेशन अंतर्गत भिवापूर वार्डात राहणाऱ्या कैलाश दुर्गे यांच्या राहत्या घरी काल रात्री घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. या घरफोडीत रोख रक्कम आणि सोने चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कैलाश दुर्गे हे आपल्या कुटुंबासह भिवापूर वार्डात राहतात. काल रात्री ते घरी नव्हते. त्यावेळी चोरांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातून रोख रक्कम आणि सोने चोरी केल्यानंतर चोर पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत सहित शहर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस शिपायालाच घरफोडीच्या गुन्ह्यात रामनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनेने आणि सतत वाढत चाललेल्या गुन्हेगारी यंत्रनेला पोलीस प्रशासन सपशेल फेल ठरलेले आहे.
पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करून गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.