अरे बापरे! चंद्रपूर एस पी चे बनावट फेसबुक अकाउंट!

1008

अरे बापरे! चंद्रपूर एस पी चे बनावट फेसबुक अकाउंट!

चंद्रपूर – जिल्ह्यात सायबर क्राईम चे प्रकार वाढतच असताना आता तर थेट चंद्रपूर पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशीं यांच्या नावानेच हॅकरने सोशल मीडिया वरून फेसबुक चे बनावट अकाउंट उघढत फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

फेसबुक वर एस पी चा फोटो टाकून हॅक्करने चक्क पोलीस खात्याला च चालेंज दिला आहे. एरव्ही अनेक प्रकारच्या नामांकित व्यक्तीच्या फेसबुक वरून बनावट अकाउंट वरून पैसे उकळण्याच्या किती तरी घटना उघडकीस येत असताना आता थेट पोलीस अधीक्षक च्या नावाने अकाउंट क्रीयेट करून चॅट करण्याचा प्रकार सुरु आहे.

 

पोलीस अधीक्षक यांच्या लक्षात येताच त्यांनी फ्रेंड् रिक्वेस्ट स्वीकारू नका, ब्लॉक करून फेसबुक ला रिपोर्ट करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या समोर हॅकरला पकडण्याचे मोठे आवाहन आहे हॅकर पकडला जातो की काय असा प्रश्न जनसामान्य नागरिकांना पडला आहे. या सोबतच अनेक अधिकाऱ्याच्याही बनावट प्रोफाइल तयार केल्या असून फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या असल्याचे निदर्शनास येत आहे. आणि त्या बनावट आय डी वरून पैसे उकळण्याचा प्रयत्न हॅकर द्वारा सुरु आहे. कोणीही या भूलथापानां बळी पडू नका असे रवींद्र सिंह परदेशीं यांनी आवाहन केले आहे.