पोलिसांच्या नजरे खालून शहरातील दोन ताराकिंत हॉटेल मध्ये जुगाराचा अड्डा?

525

पोलिसांच्या नजरे खालून शहरातील दोन ताराकिंत हॉटेल मध्ये जुगाराचा अड्डा?

चंद्रपूर – शहरातील दोन तारांकित हॉटेल मध्ये सध्या जुगाराचा डाव खेळल्या जात आहे.लाखो रुपयांचा डाव या ठिकाणी खेळला जात असताना पोलिसांना माहिती नाही का? की त्या हॉटेल वर कारवाई च करायची इच्छा नाही? हा खरा प्रश्न निर्माण होत आहे.या ठिकाणी वेग वेगळ्या महफिल बसत असून रम्मी,थ्री कार्ड,तसेच कट्टा,( अंदर – बाहर)या पत्यावर लाखो रुपयांचा डाव खेळल्या जात आहे.शहरातील बस स्टँड परिसरातील त्या हॉटेल मध्ये रोज जुगाराचा अड्डा भरवल्या जात असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या रामनगर पोलिसांना माहिती नाही का तसेच स्थानिक गुन्हे शाखेला ही याची कल्पना नाही का हा संशोधनाचा विषय आहे.नागपूर रोड जवळील ही वडगाव नजिक अशाच एका तारांकित हॉटेल मध्ये सुध्धा असाच प्रकार सुरू असून त्या हॉटेल व्यावसायिकाने तर अड्डा च बनवला आहे.रोज ५०हजाराचे बिल या हॉटेल चालकाकडून बनवल्या जात असून जुगाराला जणू खुली मेजवानी दिल्याचे चित्र दिसत आहे.दुपारी १वाजला की वेग वेगळ्या जुगाराच्या टीमा या ठिकाणी जमा होतात.गेल्या सहा महिन्यांपासून असाच डाव या ठिकाणी खेळला जात असून या कडे पोलिस खात्याचे दुर्लक्ष म्हणावे लागेल.या हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांची चांगलीच मेजवानी आज पर्यंत केली असल्याचे बोलल्या जात आहे. छोटे अधिकारी ते वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत संबधाचा फायदा घेत हा हसमुख व्यापारी जणू जुगाराचा क्लब च चालवत आहे? एरव्ही कुठेही जुगाराचा डाव बसला की पोलिस लगेच पोहचतात मग या ठिकाणी का नाही? राजकीय वरदहस्त असलेल्या या हॉटेल व्यवसायाला सध्य्या जुगरापासून सुगीचे दिवस आले आहे.काही कोट्यधीश मंडळी या ठिकाणी ठीय्याच मांडून बसले आहे.मग काय ती महफिल,काय तो दारूचा ग्लास,काय तो पत्याचा डाव आणि काय ते हॉटेल आल इज वेल म्हणत सुसाट सुरू आहे.