चंद्रपूर जिल्ह्यातील व्हिडिओ गेम ला- नो एंट्री….
जिल्हाधिकारी विनय गौडा नी नूतनीकरण नाकारले
चंद्रपूर – जिल्ह्यातील सुरू असलेल्या व्हिडिओ गेम ला अखेर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बंद करण्याचे निर्देश दिले आहे. व्हिडीओ गेम च्या नावाखाली सर्रास जुगार खेळल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन केली होती.अवैध व्हिडीओ गेम च्या नादात कितेक लोकांचे संसार बरबाद झाले.मशीन मध्ये सेटिंग करून अनेकांची लुटमार करण्यात आली.वरोरा येथे एका तरुण मुलाने व्हिडीओ गेम मध्ये पैसे हरल्याने व त्यानंतर कर्ज बाजारी झाल्याने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली होती.त्यामुळे जिल्ह्यात त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सुध्दा या प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.शेवटी पोलिस अधीक्षक परदेशी यांनी यांचे लायसेन्स ला रिजेक्ट केले त्याच याचा अहवाल घेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्हिडिओ गेम ला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.