चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्याचा हाहाकार, क्राईम ग्राफ वाढतोय
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याचा हाहाकार माजलेला आहे. कोळसा तस्करी, सट्टेबाजी, सुगंधित तंबाखू, डिझेल तस्करी, क्रिकेट बॅटिंग, भंगार चोरी, घरफोड्या, ऑनलाईन जुगार, त्यासोबतच व्हिडिओ गेम हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या अवैध धंद्यांना पोलिस प्रशासनाने आळा घालण्यास अपयश आले आहे.
चंद्रपूर उपविभागात दुर्गापूर, पडोळी, आणि शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगार प्रवूत्तीने आपले जाळे पसरवले आहे. या ठिकाणी कोळसा तस्करी, सट्टेबाजी, जनावर तस्करी, जुगार अड्डे, सुगंधित तंबाखू, धान्याचा काळा बाजार, या सह अनेक घडामोडी सुरू आहेत.
राजुरा उपविभाग अंतर्गत राजुरा, बल्लारपूर,विरुर(रेल्वे),गोंडपिपरीहे पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचे हब बनले आहे. राजुरा मध्ये कोळसा तस्करी,सट्टेबाजी,जनावर तस्करी,जुगार अड्डे, सुगंधित तंबाखू,धान्याचा काळा बाजार, या सह अनेक घडामोडी सुरू आहेत.
नांदा फाटा उप विभागीय अंतर्गत गडचांदूर,कोरपना,जिवती, पाटण, वणी कॅम्प पोलिस स्टेशन हे मोठे पोलीस स्टेशन आहेत. या ठिकाणी कोळसा चोरी, सट्टेबाजी, दारू तस्करी, आणि इतरही अवैध धंद्यांना चालना मिळाली आहे.
वरोरा उपविभागीय अंतर्गत वरोरा,भद्रावती, माजरी,हे प्रमुख पोलिस स्टेशन असून तुरळक अवैध धंदे सोडले की या ठिकाणी आय पी एस आयुष नोपानी यांनी आपला चांगलाच वरद हस्त निर्माण केला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीची त्यांनी चांगलीच कोंडी निर्माण केली आहे.
मुल उपविभागिय अंतर्गत मुल, सावली, पोंभुरंना या तिन्ही पोलिस स्टेशन अंतर्गत रेती ची मोठी तस्करी होत आहे. इतरही अवैध धंद्यांना या ठिकाणी मोकळीक रान आहे.
ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी अंतर्गत सिंधेवाही, नगभिड,आणि ब्रम्हपुरी हे प्रमुख पोलिस स्टेशन आहे.सिंदेवाही या ठिकाणी जनावर तस्करी,सट्टेबाजी,क्रिकेट बेट तसेच रेती तस्करीचे रॅकेट सक्रिय आहे.
चिमूर उपविभागीय मध्ये भिसी, शेगांव,चिमूर येथे अवैध धंदे सुरू आहेत.
एलसीबी चे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना नव महिने उलटूनही अद्याप पाहिजे तसे जिल्ह्यावर गुन्हेगारी आणि अवैध धंद्यावर छाप सोडता आली नाही आहे. जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंद्यांना ते कधी बंद करतील हा प्रश्न आहे?
पोलिस अधीक्षकाची भूमिका यावर ठरणार आहे. जर पोलिस अधीक्षक स्वतः यावर लक्ष देतील आणि कारवाई करतील तर अवैध धंद्यांवर आळा बसू शकतो. मात्र, आतापर्यंत पोलिस अधीक्षकांनी यावर विशेष लक्ष दिले जात नाही.
लोकप्रतिनिधींनी याबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. गृहमंत्र्यांनी यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी लागणार आहे.