दुय्यम निबंधक कार्यालयात *भ्रष्टाचार* जोमात; मोह मायेचा ब्रह्मनंद,…

457

दुय्यम निबंधक कार्यालयात *भ्रष्टाचार* जोमात; मोह मायेचा ब्रह्मनंद,…

 

चंद्रपूर : जमीन खरेदी-विक्री आणि फेरफार करण्यासाठी दुय्यम निबंधक विभागाची परवानगी घ्यावी लागते. यासाठीचे काटेकोर नियम आहेत. मात्र या नियमांना धाब्यावर बसवत जमिनींची खरेदीविक्रीची परवानगी याच कार्यालयातुन देण्यात येत आहे. यातून दररोज लाखोंची माया जमवली जात आहे?ह्या सर्व भ्रष्टाचाराचा हिशोब हा किरण नामक एका महिला कडे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी मूल येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. असे असताना चंद्रपूर कार्यालात मात्र हा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.

 

जमिनीची खरेदी किंवा विक्री तसेच त्याची फेरफार करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातुन परवानगी घ्यावी लागते. जर कागदपत्रे योग्य असली की याचा शासकीय महसूल जमा करावा लागतो. मात्र चंद्रपुरातील कार्यालात सर्व कागदपत्रे ओके असले तरी काही न काही त्रूट्या काढून त्याला रिजेक्ट केले जाते. अनेकदा होत असलेल्या या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आणि पैसे देण्यास त्यांच्यावर दबाव आणला जातो, तर दलालांची व्यवस्था ही त्याहून वेगळी आहे. या प्रकाराची दिवसाची उलाढाल ही लाखो रुपयांची आहे. पैसे हेच ‘ब्रह्म’ आणि त्यातून ‘आनंद’ मानला जात आहे. ह्या काळया पैशांचा हिशोब ‘किरण’ नामक एका महिला कर्मचारी ठेवते. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. सामान्य माणसांची कामे खोळंबली जात असून त्यांना वेठीस धरले जात आहे. तर ज्यांच्याकडून ‘वजन’ ठेवले जाते त्यांना मात्र कागदपत्रात सूट देऊन परवानगी दिली जाते. विषेश म्हणजे काही महिन्यांपूर्वी मूल येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील महिला रजिस्ट्रारला दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.मात्र चंद्रपुरात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंद्रपुरातील दुय्यय निबंधक कार्यालयात लक्ष देऊन कोण हा भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा सपाटा सुरू केल्याने जिल्ह्यातील भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी याकडे लक्ष दिल्यास भ्रष्टाचार करणारे मोठे मासे गळाला लागू शकणार