आज रा.को.ख. मजदूर संघाचे घेराव आंदोलन,के.के.सिंग यांचे नेतृत्व

71

दि. १३ नवंबर, सुनील तायडे


वेकोली दुर्गापूर उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ तर्फे एकदिवसीय धरना व घेराव आंदोलनाचे आयोजन वेकोली दुर्गापूर उपक्षेत्र कार्यालयासमोर रविवार 13 नोव्हेंबर ला केले जाणार आहे.
राकोखम संघाचे महासचिव के के सिंग यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनात इंटक नेते शंकर खत्री,अविनाश लांजेवार,रवी धात्रक यांची उपस्थिती राहील अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून वेकोली प्रबंधनाबाबत कामगारांच्या तक्रारी असून या कडे जाणीव पूरक दुर्लक्ष होत असल्याने कामगारांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाही.यासाठी राकोखम संघाने मागील 5 वर्षात 8 वेळा निवेदन देऊन व्यवस्थपनासोबत बैठका घेतल्या पण,काहीच निष्पन्न झाले नाही,,म्हणून घेराव आंदोलन केले जात आहे अशी माहिती के के सिंग यांनी दिली.

सुनील तायडे                           संपादक                                      डेली पोस्टमार्टम