चंद्रपूर -दि. ११ एप्रिल २२ ( सुनील तायडे )
दारु दुकानाच्या स्थगीतीसाठी नागरिकांची उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक
जनविकास सेनेचे नेतृत्व : पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात आंदोलनकर्ते पोहचले कार्यालयात
दाताळा रोड जगन्नाथ बाबा मठ, डॉ. राम भारत यांच्या बाल रुग्णालयाच्या शेजारील दुकान, श्रीकृष्ण टॉकीज जवळ नागदेवताच्या मंदिर परिसरातील देशी दारू दुकान, जैन भवन जवळील बिअर शॉपी वाईन शॉपसह शहरात अनाधिकृतरिता स्थालांतरीत झालेल्या दारु दुकान, वाईन व बिअर शॉपला स्थगीती देण्यात यावी, या मागणीसाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात बुधवारी संतप्त नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात धडक दिली.
दारूबंदी प्रतिबंधक कायदा १९४९ मधील कलम ड (५) नुसार देशी दारू दुकान, वाईन शॉप, परमिट रूम, बिअर शॉपी यांची मंजुरी किंवा स्थानांतरणाकरिता महानगरपालिकेच्या सक्षम अधिकार्यांकडून दुकानाचे किंवा इमारतीचे बांधकाम अधिकृत असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील कोणत्याही प्रकारच्या दुकानाकरिता मनपाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून दाखला घेतलेला नसल्याचे मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील यांना लिहिलेल्या पत्रातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील सर्व देशी दारू दुकानांचे स्थानांतरण, बिअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूमची मंजुरी नियमबाह्य असल्याने सर्व दुकानांना तातडीने स्थगिती देण्याची मागणीसाठी बुधवारी नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देत अधीक्षकांना निवेदन दिले. राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक मारोती पाटील, सहाय्यक निरीक्षक अमित क्षीरसागर, पोलीस विभागातील अधिकारी यांनी अनेक दुकानाच्या बाबतीत दिलेले अहवाल संशयास्पद असल्यामुळे या सर्व अहवालांची उच्चस्तरीय तक्रार करून सर्व दोषी व भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्याचा इशारा यावेळी देशमुख यांनी दिला. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी कार्यालयाच्या बाहेर येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
ज्यावेळी मनीषा बोबडे, अरुणा महातळे,मेघा दखणे,माया बोढे,आशु कष्टी,करूणा तायडे,सुचिता ढेंगळे,मेघा मगरे ,कविता अवथनकर,रमा देशमुख,बेबीताई राठोड़,वच्छला पंधरे ,शोभा तोड़ासे ,निलीमा लोणारे,वैशाली मानकर, रेखा गिरडकर , शिला बिरमवार ,भवानी बैस,बबिता लोडेल्लीवार,निलिमा वनकर,भाग्यश्री मुधोळकर,निशा हनुमंते,प्रफुल बैरम, संदिप कष्टी,अजय महाडोळे,घनश्याम येरगुडे, सुभाष पाचभाई,दिलिप होरे,
सुहास फुलझले,इमदाद शेख,अक्षय येरगुडे,आकाश लोडे,अमोल घोडमारे,राहुल दडमल,हरिश गाडे,विशाल बिरमवार,
रतन शीलावार, संजय निकोडे,राजेश डागा, जितेंद्र मेहर,अनिल बोथरा, गौतम कोठारी,अमित पुगलिया,जितेंद्र चोरडिया, ,प्रमोद ढेंगळे, बाळू नगराळे, सुहास अवथनकर,संजय ढेंगळे, रमेश ढेंगळे, नितीन झाडे, अभिजित मोहगावकर, शाहरुख मिर्झा,निलेश लोणारे उपस्थित होते.
पोलीस सुरक्षा भेदून कार्यालयात प्रवेश
शहरातील दारु दुकानाविरोधात नागरिक एकवटले आहेत. विविध प्रकारचे आंदोलन करुन लक्ष वेधत आहेत. दरम्यान नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. विभागाच्या बाहेरील गेट पोलिसांनी आतून बंद केले होते. त्यामुळे सर्व आंदोलनकर्ते बाहेर रस्त्यावर उभे होते. मात्र संधी साधून जन विकास सेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा बोबडे आक्रमक झाल्या पोलिसांना न जुमानता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जबरदस्तीने प्रवेश दाराला धक्का देऊन आतमध्ये प्रवेश केला. यावेळी महिला पोलिसांनी बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी थेट उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून आंदोलन सुरू केले व जोरदार घोषणाबाजी केली. थोड्या वेळासाठी आंदोलकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आवारातच ठिय्या सुद्धा मांडला.
सुनील तायडे डेली पोस्टमार्टेम