चंद्रपूर – नागपूर गृह निर्माण व क्षेत्र विकास मंडळ नागपूर अंतर्गत गटार पाईपलाईचे 24 एमएलडी, एसटीपी व एसबीआर तंत्रज्ञ इलेक्ट्रीकल व मेक्यानिकल काम चंद्रपूर म्हाडा द्वारे केले जात आहे. 53 कोटी 29लाख 22 हजार रुपयांचा गटार लाईनचा हा प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच निकृष्ट कामामुळे चर्चेत आला आहे. सिव्हरेज प्लांट च्या भिंतींना भेगा पडल्या तर मॅन होलला तडे गेले.या नंतरही ते काम योग्य आहे,अशी स्पष्टोक्ती म्हाडाच्या कार्यकारी अभियंता उषा टेम्भूरणें यांनी बोलतांना दिली आहे.
दाताळा,देवाडा व कोसारा येथील सांडपाणी शुद्ध करण्याची म्हाडाची ही महत्वाकांक्षी गटार योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.2018 मध्ये या कामाला अधिकृत कंत्राटदार ईगल इन्फ्रा इंडीया लिमीटेड या कम्पनीने सुरवात केली.2021 ला हे काम पूर्ण करावयाचे असतांना कोरोनाने घात केला.आता पर्यंत 80 % कामे पूर्ण करण्यात आले.परंतु यातील बरीच कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य नाहीत.सदर कामाच्या सिव्हरेज प्लांटच्या इमारतीला तडा गेल्याने त्यावर मलमपट्टी करण्यात आली आहे. तर गटार पाईपलाईनच्या चेंबरला तडे गेल्याचे आढळून येत असल्याचे आढळून येत आहे.किमान 72 किमी लांबीच्या पाईप लाईनची पाहणी केली असता अनेक ‘मॅन होल्स’ला तडा गेल्याचे आढळून आले.सिव्हरेज प्लांटचे देखील हाल बेहाल असून त्याची डागडूगी करण्यात आली आहे.या बांधकामाच्या चौकशी करण्याची मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केल्या नंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्वरित चौकशी करण्याचे निर्देश दिले.त्या अनुषंगाने शुक्रवारी 22 एप्रिलला म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.अधिकाऱ्यांनी तक्रारकर्ते राजेश बेले यांना ही पाचारण केले.तडे गेलेल्या सर्व मॅन होल वर माती टाकल्याचे यावेळी निदर्शनास आले.
*अधिकारी घेत आहेत कंत्राटदाराची बाजू* पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या टिम सह गटार योजनेच्या बांधकामाची तपासणी केली. यावेळी म्हाडाचे कार्यकारी अभियंत्या उषा टेंभुर्णे, उप अभियंता दिलीप लामपूसे, ईगल इन्फा इंडिया लि. चे गोपाल झोडे उपस्थित होते.गटार योजनेच्या बांधकामाची तपासणी करण्यात येत असताना तक्रारकर्त्यांनी घेतलेल्या आक्षेपाची शहानिशा करण्यात आली. तक्रारकर्त संजीवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी गटार योजनेच्या बांधकामाला गेलेले तडे तसेच बांधकामात उपयोग करण्यात येत असलेल्या निकॄष्ट दर्जाच्या साहित्य अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. गटार योजनेच्या बांधकामाची तपासणी करताना म्हाडाचे अधिकारी कंत्राटदाराची पाठराखण करत होते,असा आरोप संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केला. गटार योजनेच्या बांधकामाचा दर्जा खराब असताना देखील अधिकारी त्याची नोंद घेण्यास तयार नव्हते.त्यामुळे म्हाडाच्या गटार योजनेच्या बांधकामातील भ्रष्टाचारात अधिकारी व कंत्राटदार सहभागी आहे. असा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केला आहे.
ही रुटीन विहिर होती
कार्यकारी अभियंता उषा टेम्भुरने यांनी, 3 दिवसांनी माहिती देण्याचे कबूल केले होते.त्यानुसार सम्पर्क साधला असता,त्या म्हणाल्या,ही रुटीन विहिर होती.पाहणी केली काम योग्यच आहे.याचे डिटेलिंग करून संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेला कळवते.राहिला प्रश्न बँकेच्या कागदपत्रांबाबत,तर तो आमचा विषय नाही,असे त्या म्हणाल्या.