सरकारी स्वस्त धान्य दुकानातील अपहारांची स्वंतत्र पथक-गठीत करुन चौकशी करा, पत्रपरिषदेत रेशनकार्ड धारकांची मागणी

219

दि. 26 डिसेंबर ( सुनील तायडे )              सरकारी स्वस्त धान्य दुकानातील अपहारांची, स्वंतत्र पथक-गठीत करुन चौकशी करा. पत्रपरिषदेत रेशनकार्ड धारकांची मागणी.

गरिबांना सवलतीच्या दरात धान्य मिळावे, त्यांची दोन वेळची चुल पेटावी या उद्देशाने शासन रेशन कार्ड धारकानां माफक दरात धान्य देते.परंतु या योजनांना हरताळ फसले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अडचण येऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील नागरिकांना मोफत धान्य देण्यांत आले. आतांही “हे” धान्य दिल्या जात आहे. मात्र महाकाली मंदिर वार्ड येथील रेशन दुकानदार कमलेश लहामगे आणि भिवापूर वार्ड येथील धान्य दुकानदार संतोष लहामगे लाभार्थ्याच्या हक्कांचे धान्य देण्याचे टाळत आहे.येथे मोठ्या प्रमाणात अपहार होत असून याची स्वतंत्र पथक गठित करून चौकशी करा,अशी मागणी समाजसेवक सुधाकर काटकर यांनी शुक्रवार (24 डिसेंबर) ला पत्रपरिषदेतून केली आहे.
यावेळी रेशनकार्ड धारक पुष्पा हेडाऊ,हेमलता सहारे,पूनम मडावी,पुष्पा कटरे यांची उपस्थिती होती.

काटकर म्हणाले,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य पुरविले जाते. मात्र वरील दोन्ही दुकानदार लाभार्थ्याची दिशाभुल करुन एका महिन्यांचे धान्यं दुसऱ्यां महिन्यांत तसेच ई-पास मशीनवर अंगठा घेऊनहीं, काही वेळां धान्यंच देत नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्या नंतर मे महिन्यांमध्ये ई-पास व मशीनवर रेशन दुकानदारांचाच अंगठा घेण्यांचा निर्णय झाला. याचा दुरुपयोग “या” दोन्ही दुकानदारांनी केला.असा आरोप त्यांनी केला.अनेकांना मोफत धान्यंच मिळालेच नाही. यातुन सरेआम फसवणूक करण्यांत आल्याची तक्रार लाभार्थ्यांची आहे असे ते म्हणाले. केवळ 60% धान्य वितरीत केले जात आहे. रेकॉर्डवर फक्तं मुळ परवाना धारकाचे नांव चालविले जाते आहे. धान्यांची सोडवणूक व उचल साठी पुरवठा विभागांच्या प्रशासकीय सरकारी कामकाज प्रक्रियेत अक्षरश: मुळ-परवानाधारकांच्या नावांची बनावट व खोटी सही केली जात आहे. मात्र यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याची मुख्य जबाबादारी असलेले पुरवठा विभागांचे सरकारी अधिकारी “हे” उघडया डोळ्यांनी पाहून सुध्दां, चिरीमिरी घेऊन त्याकडे जाणिवपुर्वक कानांडोळां करीत आहेत. यात मुळ-परवानाधारक संतोष लहामगे “हे” स्वतः दुकान चालवीत नाहीत. तर कमलेश लहामगे “हा” मुळ परवानाधारक

नियम व शर्तीचा भंग करून दुकान चालवीत आहे. मात्र पुरवठा विभागांचे संबंधित अधिकारी या सर्व धांधलिकडे केवळ दुर्लक्ष करीत आहेत,असा आरोपही काटकर यांनी केला.

*हे ,निवडणुकीवर लक्ष ठेवून बदनाम करण्याचे षडयंत्र- संतोष लहामगे*

महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे होऊ घातल्या आहेत.म्हणून निव्वळ बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे.मुळात कार्डधारकांची एकही तक्रार नाही.शासनाच्या सर्व योजना ऑनलाईन आहेत.म्हणून भ्रष्टाचार केला जाऊ शकत नाही.40 वर्षांपासून दुकान आहे,पण तक्रार नाही.पुरवठा विभागाने सुचविल्या प्रमाणे 2 दुकानं झाली आहेत.तरीही तक्रार आहेच.म्हणून हे निव्वळ षडयंत्र असून सारे आरोप खोटे आहेत,अशी प्रतिक्रिया रेशन दुकानदार संतोष लहामगे यांनी दिली.

*पाईप लाईनसाठी घेतले हस्ताक्षर..*

आम्ही अनपढ आहोत.सुधाकर काटकर यांनी नवीन नळजोडणीची मागणी करण्यासाठी अर्जावर हस्ताक्षर मागितले म्हणून हस्तक्षर केले.परंतु त्याचा दुरुपयोग केला जात आहे,असा गौप्यस्फोट रेशनकार्ड धारक मधुकर कुळमेथे यांनी केला आहे.

कार्डधारकांच्या तक्रारी नाही,तरी चौकशी करू..भराडी*

या प्रकरणात ज्या तक्रारी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. पोलीस कारवाई करा हे म्हणणे योग्य नाही.प्रक्रिया ऑनलाइन असल्याने भ्रष्टाचार करता येतच नाही.व्यवहार पारदर्शक आहेत. विशेष म्हणजे कार्डधारकांची तक्रार नाही.तरीही चौकशी करू,अशी प्रतिक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी शालीकराम भराडी यांनी दिली.