चंद्रपूर :- १८ नोव्हेंबर ( सुनील तायडे )
चांदा क्लब ग्राऊंडवरील एम्युझमेंट पार्क देत आहे कोरोनाला निमंत्रण.
जिल्हा प्रशासनाची कोरोना नियमांना तिलांजली तर नाही ना ? दररोज 5000 लोकांची मांदियाळी.
शहराच्या मध्यभागी असलेल्या चांदा क्लब ग्राऊंड येथे मागील 2 आठवड्या पासून एम्युझमेंट पार्क नागरिकांच्या सेवेत रुजू झाला आहे.तब्बल 40दिवस लोकांना याचा लाभ घेता येणार आहे.दररोज 5000 नागरिकांची येथे गर्दी होत असतांना कोरोना नियमांचे येथे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.त्यामुळे एम्युझमेंट पार्कसाठी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे काय.? या पार्क मधील सुरक्षा व्यवस्था नगण्य असल्याने एखादा अपघात घडला तर ..? कुणाला जवाबदार धरावे.? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
किमान दिड एकर जागेत 2 आकाश पाळणे,2 नावाडी,1 क्रॉस झुला,ब्रेकडान्स झुला,पाण्यावर चालणारे सलाम्बो याशिवाय लहान मोठे कितीतरी खेळणी येथे मनोरंजनसाठी उपलब्ध आहेत.खाण्याचे स्टॉल,खरेदीची दुकाने लोकांना आकर्षित करीत असल्याने पूर्ण कुटुंबच आनंद घेण्यासाठी येथे उपस्थित होत आहे.संपूर्ण परिसराला एकच एन्ट्री व एकच एक्सिट,एन्ट्री गेट वर थर्मल तपासणी न करता ,हात सॅनिटाईज न करता अरुंद रस्त्यातून आत सोडणे.अग्निशामकाची व्यवस्था नसतांना गॅस सिलेंडेरचा उघड्यावर वापर करणे,भौतिक अंतर न पाळणे,लोकांना रांगेत न ठेवणे.निर्जंतुकिकरण न करणे,हात धुण्याची योग्य सोय नसणे,नेहमी मास्क घालून राहण्यास बाध्य न करणे यामुळे त्या आंनदात केव्हा विरजण पडेल सांगता येत नाही.स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष पुरविले नाही तर तिसरी लाट केव्हा आली हे आपणास कळणारच नाही.
*आग लागण्याची दाट शक्यता…*
एम्युझमेंट पार्क 3 बाजूने कापडी पडद्याने वेढला आहे तर इतर आकर्षक सेट ज्वलनशील फ्लेक्स पासून तयार करण्यात आला आहे.अश्यातच गॅस सिलेंडेरचा वापर होणारे स्टॉल सुद्धा कापडाच्या झालरने सुशोभित केले आहेत.अश्या स्थितीत एक ठिणगी होत्याचे न्हवते करू शकते.हे तितकेच सत्य.
*एम्युजमेंट पार्क साठी कोरोना नियम व तफावत*
राज्य शासनाने 15 ऑगस्ट पासून ब्रेक द चैन अंतर्गत सुधारित नवीन निर्देश लागू केले.या आदेशानुसार मोकळया जागेतील कोरड्या राईड्स ला परवानगी देण्यात आली.चंद्रपुर जिल्ह्यात 22 ऑक्टोबर पासून ही मुभा देण्यात आली.आणि पाण्यातील राईड्ससाठी सक्त मनाई करण्यात आली.तरी देखील लहान मुलांसाठी येथे पाण्यावरील एक राईड सुरू आहे.
शासनाच्या नियमानुसार पार्क मधील वातावरण आरोग्यदायी व पोषक असावे,पण येथे किमान 6 डिझेल इंजिन वातावरण दूषित करत आहेत.6 फूट चे अंतर राखायचे असतांना प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे.
राईड झाल्यानंतर निर्जंतुकीकरण करावयाचे असताना त्याला बगल दिली जात आहे.अश्या अनेक तृट्या येथे बघावयास मिळत आहेत.
लसीकरणाचे काय…..?*
सार्वजनिक ठिकाणी वावरताना 2 वेळा लसीकरण झाले त्यांना मास्कचे बंधन ठेवून मोकळीक आहे.पण या पार्कमधे सर्वांनाच सूट आहे.माहिती नुसार 40 महिला व 80 पुरुषांना येथे रोजगार मिळाला.खाद्यपदार्थ व इतर दुकाने सोडून ही संख्या आहे.मनपाने 2 दिवसापूर्वी 2 लसीकरण झाले,याचे स्टिकर दुकानदारांना लावणे क्रमप्राप्त केले.येथे मात्र खुली सूट दिलेली दिसते.बाहेरून आलेल्या एम्युझमेंट पार्क मधील लोकांचे लसीकरण झाले का….?हा एक संशोधनाचा विषय आहे.
सुनील तायडे. संपादक डेली पोस्टमार्टम