संपात सहभागी १४ एस. टी. कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन.

117

चंद्रपूर : 9 नोव्हेबर ( सुनील तायडे ) शासकीय सेवेत विलणीकरणासाठी संपाचे हत्यार उपसणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली असुन आज मंगळवारी 9 नोव्हेंबर 2021 रोजी संपात सहभागी 14 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे आदेश निर्गमित झाले आहे.

प्राप्त माहितीनुसा, एस टी कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून दिनांक 27 व 28 ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी उपोषण आंदोलन पुकारले होते.. याअनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

मात्र चंद्रपूर आगारातील काही कर्मचाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता 9 ऑक्टोबर पासुन संप पुकारला ह्या संदर्भात महामंडळाने औद्योगिक न्यायालयामध्ये युएल. पी. क. २१७/२०२९ याचीका दाखल केला. त्यानुसार औद्योगिक न्यायालयने सदरचा संप अवैध ठरविला. त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालयाने रिट पिटिशन २१६९९/२०२१ दिनांक- ०३/११/२०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार प्रवाशांची गैरसोय होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी संपापासून परावृत्त होऊन कामगिरीवर हजर होण्याबाबत आदेश पारीत केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर एस.टी. महामंडळाला शासनास विलीनीकरण करण्याकरीता राज्यस्तरीय संप जाहीर केला. त्यामुळे प्रवाशांची तर गैरसोय झालीच शिवाय एस टी महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

काही कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांना संपात सहभागी करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावर अडविले व त्यांना चिथावणी देऊन संपात सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त केले असा ठपका त्या 14 कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. प्रवाशांची झालेली गैरसोय, महामंडळाचे झालेले आर्थिक नुकसान व नियमबाह्य संप पुकारणे ह्या कारणांमुळे सदर 14 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित 14 कर्मचाऱ्यांपैकी 5 कर्मचारी चंद्रपूर आगारातील असुन विभागाच्या इतर आगारातील 9 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

काही दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याचे संकेत असुन दिवाळीच्या काळात चंद्रपूर आगाराचे दररोज 30 ते 32 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता गृहीत धरून काही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सुनील तायडे