चंद्रपूर:- ८ नोव्हेंबर ( सुनील तायडे )
वरोरा:-वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोखाळा या गावाला जंगलचा भाग लागून आहे जंगलातील अन्य प्राणी हे गावाच्या दिशेने शेतातील शेतपिके खाण्यासाठी येत असतात,यांच्या शोधत आलेला वाघ गावातील महादेव शिवा सरपाते यांच्या सर्व्ह नं100 शेतातील विहिरीत पडला, सकाळच्या सुमारास शेतकरी मोटर लावण्यासाठी गेले असता वाघ पडून असल्याचा आढळला.
शेतकरी सरपाते,यांनी याची माहिती वरोरा वनविभागाला दिली,वनविभागाचे कर्मचारी,अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून वाघाला वाचविण्यासाठी विहिरीत मोठे लाकडाचे ओंडके टाकले,नंतर एका खाटेला दोर बांधून विहिरीत सोडण्यात आली तीन तासाच्या प्रयत्नानंतर वाघ हा बाहेर पडून वाघाने जंगलाच्या बाजूने धूम ठोकली, घटनेची माहिती सर्वत्र पसरताच नागरिक,महिला,युवा यांनी एकाच गर्दी केली होती तर शेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी,कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते,वाघ पळून गेला असला तरी तो कुठेही लपून राहू शकतो त्यामुळे वनविभागाचे अधिकाऱ्यांनी रात्री दिवसा गस्त घालावी,तर शेतकऱ्याच्या शेतमालाला पाणी देण्यासाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
सुनील तायडे