चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखाने केली गौतम नगर, चंद्रपूर येथील अनैतीक देहव्यापार अडडयावर कारवाई.

118

चंद्रपूर: 26 सप्टेंबर ( सुनील तायडे )स्थानिक गुन्हे शाखाने केली गौतम नगर, चंद्रपूर येथील अनैतीक देहव्यापार अडडयावर कार्यवाह करुन राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगना या परराज्यातील तीन पिडीत मुलींची केली सुटका.

मागील काही दिवसापासुन चंद्रपुर जिल्हयात एका ठिकाणी अनैतीक देहव्यापार चालु असल्याबाबत तक्रारी पोलीस अधिक्षक अरविद साळवे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुशंगाने पोलीस अधिक्षक यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना पथक तयार करण्याचे सुचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथक तयार केले. दि. २५/०९/ २०२१ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीत गौतम नगर, चंद्रपूर येथे एक महिला अल्पवयीन मुलींकडून आर्थीक फायदया करीता देहव्यापार करवून घेते अशा मिळालेल्या माहिती वरून सदर माहितीची बोगस ग्राहका कडुन खात्री करून गौतम नगर, चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कार्यवाही केली असता त्या ठीकानी दोन स्त्रीया या परराज्यातील मुलींकडून आर्थीक फायदया करीता देहव्यापार करवून घेताना मिळुन आल्याने त्यांना महिला पोलीसांचे मदतीने ताब्यात घेवून त्यांचे कडुन राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगना या परराज्यातील तीन पिडीत मुलींची सुटका करुन त्यांना स्त्री आधार गृह चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले.

सदर कार्यवाहीत दोन आरोपी महीला विरोधात पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अपराध कमाक ७५९/२०२१ कलम 370 370 (ए). 371 भा.द.वी. सह कलम 3, 4, 5, 6, 7 अनैतीक मानवी व्यापार प्रतीबंधक अधिनीयम 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर चे अधिकारी करीत आहे.

सदरची यशस्वी कामगीरी मा. श्री. अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, पो.नि. पुसाटे नियंत्रन कक्ष चंद्रपुर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, स.फौ. नितीन जाधव, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. सुधीर मत्ते, पो.कॉ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरे, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो.शि. निराशा तितरे, अपर्णा मानकर यांनी केली.