बाबुपेठ परिसरात अवैध लाकुड जप्त, विभागीय दक्षता वन अधिकाऱ्यांची मोठी कार्यवाही.

113

चंद्रपूर: 25 सप्टेंबर ( सुनील तायडे )

बाबुपेठ परिसरात अवैध लाकुड जप्त, विभागीय दक्षता वन अधिकाऱ्यांची मोठी कार्यवाही

चंद्रपुर :- मागील 15 दिवसांपासून वनविभागातील अधिकारी कर्मचारी यांना बाबुपेठ परिसरातील एक फर्नीचर व्यावसायिक जूनोना जंगलातून अवैध गोल लठ्ठे डोक्यावर आनणाऱ्या व्यक्तिकडून खरेदी करून त्याची कटाई करीत असल्याचा सुगावा लागला.
त्याआधारे त्याचेवर पाडत ठेवत आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता विभागीय दक्षता वनअधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी सतीश चोपडे यांनी चंद्रपुर वनवीभाग मोबाईल स्कॉट तसेच वनपाल व वनरक्षकांसह बाबुपेठ येथील आंबेडकर नगर मधील वानखेडे यांचे घरी धाड टाकली असता अवैध गोल लठ्ठे व कट साईज असा अंदाजीत 1 लाखाचा माल तसेच लाकुड कटाई च्या 2 मशीन जप्त करण्यात आल्या तसेच त्याचे शेजारील घोनमोडे नामक फर्नीचर व्यावसायिकाकडे पाहणी केली असता 4 गोल लठ्ठे व 1 मशीन जप्त करण्यात आली.
सदर कार्यवाही मूख्य वनसंरक्षक चंद्रपुर सर्कल यांच्या मार्गदर्शनात विभागीय दक्षता वनअधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी यांच्या नेतृत्वात वनपाल तावाडे, वासेकर, गोजे, वनकर व क्षेत्र सहाय्यक पाथारडे तसेच वनरक्षक पठान, दहेगावकर, देवानंद उमरे, गोधने, भीमनवार, पावडे यांनी केली.
सर्व फर्नीचर व्यावसायिकांनी विभागीय कार्यालयाकडून आवक जावक रजिस्टर नोंदणी व बिल बुक जमा करून नियमाने कार्य करावे असे आवाहन विभागीय दक्षता वनअधिकारी श्री चोपडे यांनी केले.

बाईट – सतीश चोपडे