चंद्रपूर: 25 सप्टेंबर ( सुनील तायडे ) सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर च्या वतीने दि.23 सप्टेंबर 2021 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री, चंद्रपूर भूषण स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयातील श्री शांताराम पोटदुखे सभागृहात अत्यंत शिस्तबध्द व देखण्या स्वरूपात करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून मा. डॉ. वेदप्रकाश मिश्रा मुख्य सल्लागार, कुलपती कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था, कराड हे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार नारेशबाबू पुगलीया, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचरलावार, मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई श्रीमती पोटदुखे, मंडळाचे उपाध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव माजी कुलगुरु डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, माजी कुलगुरु डॉ. विजय आईनंचवार, श्री मजहर अली अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ, चंद्रपूर, प्रा. शाम धोपटे, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रमोद काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या व्याख्यानाने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. मान्यवरांनी स्व. शांतारामजींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. मंडळांअतर्गत उल्लेखनीय योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी मोठया संख्येने रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाला प्रतिष्ठित गणमान्य व्यक्ती व शांतारामजींचा चाहाता वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होता.