वीज धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू, मोठी जीवित हानी टळली.

144

चंद्रपूर: 18 सप्टेंबर ( सुनील तायडे )
चंद्रपूर शहरातील बिनबा गेट बाहेरील शांतीधाम परिसरात परिसरात असलेल्या एका शेतात लावलेल्या करंटच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना आज 18 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मृत दोन्ही म्हशी या कैलास घटे यांच्या मालकीच्या असल्याचे कळते. काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास म्हशी घरी परतल्याच नाही. त्यामुळे सकाळी म्हशीचा शोध घेण्यात आला. दरम्यान बिनबा गेट परिसरातील मधुकर सोनटक्के यांच्या शेतात लावून ठेवलेल्या करंटमुळे म्हशींचा मृत्यू झाला. सकाळी दोन्ही म्हशी शेतात मृतावस्थेत आढळून आल्या. दरम्यान या घटनेची तक्रार चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. काही वेळातच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तसेच म्हशींचा पोस्टमार्टम करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. शेतात लावला जाणारा करंट हा कुणासाठीही जीवघेणा ठरू शकतो. या करंटमुळे आज म्हशींचा बळी गेला आहे. उद्या मनुष्यहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी कैलास घटे व परिसरातील नागरिकांनी केली आहे. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलिस करीत आहे.