- भाजप शिवसेना नेत्यांचा काँग्रेस मधे प्रवेश
चंद्रपूर: 16 सप्टेंबर ( सुनील तायडे )
मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्हातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे.जो तो आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सोयीचे राजकारण करीत आहे.कधीकाळी जिल्ह्यात मजबूत असलेल्या काँग्रेसला अच्छे दिन दाखवण्याचा चंग पालकमंत्री विजय वडेट्टीवार व काँग्रेसचे एकमात्र खासदार सुरेश (बाळू)धानोरकर यांनी बांधला आहे.दुसरी कडे भाजपातही पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम जोरावर आहेत.असे असले तरी राजकारणात सत्ता महत्वाची असते.त्यामुळे आता पक्षनिष्ठा पेक्षा व्यक्तिनिष्ठा महत्वाची झाली आहे.असे चित्र भद्रावतीत बघायला मिळाले.
पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार,पालकमंत्री विजय वडेट्टीवार,खा. सुरेश धानोरकर व महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या 3 नगरसेविका व धानोरकरांचे(शिवसेनेचे) निकटवर्तीय असलेले कृ. बा समितीचे संचालक वासुदेव ठाकरे आपल्याटीमसह काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला.भाजपाच्या लोकप्रतिनिधी पेक्षा ही संख्या अधिक होती.दुसरी कडे खासदार धानोरकरांचे बंधू नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे काँग्रेस प्रवेशाचे स्वप्न अधुरे राहिले.
भद्रावती नगरपालिकेत सुरवाती पासून शिवसेनेची सत्ता आहे.अर्थात ती धानोरकर बंधूंच्या कष्टामुळे व प्रभावामुळेच.2018 च्या निवडणुकीत अनिल धानोरकरांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडली 27 पैकी 16 जागेवर शिवसैनिक निवडून आले.दरम्यान शिवसेनेच्या आमदारकीला सोडचिठी देऊन सुरेश धानोरकर कांग्रेसचे राज्यातील एकमात्र खासदार झाले.हेच नाही तर त्यांच्या सुविज्ञ सौभाग्यवती प्रतिभाताई या आमदार झाल्या.आणि शिवसेनेला फटका बसला.
भद्रावतीच्या काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश या कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या 16 पैकी 7 नगरसेवकांनी पाठ केल्याने धनुष्य बाण घेऊन निवडून असलेले शिवसैनिक अनिल धानोरकर यांचा अधिकृत प्रवेश होऊ शकला नाही.त्या 7 नगरसेवकाविना प्रवेश,म्हणजे धोक्याची घंटा होती.अनिल धानोरकर याचे नगराध्यक्ष पद अबाधित रहावे म्हणूनच 16 नगरसेवकांना काँग्रेस मध्ये नेण्याचा बेत फसला.
काँग्रेसचे नेते भाजपाला हद्दपार करण्याची भाषा करीत आहेत हे खरे..पण,मुळात चित्र दुसरेच आहे.
राज्यात आज शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे.आणि भद्रावती मध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे.शिवसेनेची आमदारकी झुगारून आ सुरेश धानोरकर काँग्रेसचे खासदार झाले.हेच नाहीतर सौभाग्यवतीला त्यांनी कांग्रेसचा आमदार केले.आज नगराध्यक्ष असलेल्या बंधुला काँग्रेसची वाट दाखवली पण …..
या सर्व घटनाक्रमांचा विचार केला तर भाजपा चे नाव पुढे करून धानोरकर बंधू महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला संपवायला निघाले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सुनील तायडे संपादक ९४२२१४००४५