निराधार माय-लेकीच्या मृत्यूचे गूढ कायम, उपचारा अभावी मृत्यूचा सरपंच मोरेश्वर लोहे यांचा दावा

114

चंद्रपूर: 12 सप्टेंबर ( सुनील तायडे ) जिल्ह्यातील कोठारी येथे शनिवार 11 सप्टेंबर ला सकाळच्या सुमारास निराधार माय-लेकीचे मृतदेह आढळून आले.त्या दोघांचा मृत्यू म्हणजे भूकबळी असल्याची चर्चा रंगली असतांना, हा भूकबळी नाही असा दावा कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलतांना केला आहे.दरम्यान त्या मृत माय-लेकीचा शवविच्छेदन अहवाल अद्याप अप्राप्त असल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे.

शनिवारी झेलबाई पोचू चौधरी व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर यांचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली,गावकऱ्या नीं पोलिसांना पाचारण केले व नंतर त्या मृतदेहांवर ग्रामवासीयांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावातील चर्चे नुसार 75 वर्षीय झेलबाईला लकवा झाल्याने त्या घराबाहेर पडत न्हवत्या 43 वर्षीय मुलगी माया हिला कुणी 3/4 दिवसा पासून बघितले न्हवते.मायाच्या पायात गँगरींग झाल्याने व अशक्तपणामुळे ती पण ये जा करण्यास असमर्थ होती.अश्यातच पावसाने सतत 3 दिवस हजेरी लावली.दरम्यान दोघांचा मृत्यू झाला.राहणीमान स्वच्छ नसल्याने कुणी फारसे लक्ष देत न्हवते व त्यांची देखभाल करणारे पण कुणी न्हवते म्हणून काळाने झडप घातली अशीही एक चर्चा कोठारीत आहे.

*तो भूकबळी नाही…मोरेश्वर लोहे.*

त्या मायलेकीचा मृत्यू अन्न व पाणीच्या अभावी झाला नाही.त्यांना 2 वेळचे जेवण डबा पाठवून दिले जात होते.सुरेश आवारीवार ही सेवा पुरवायचा, शिवाय गावकरी पण वेळोवेळी अन्न द्यायचे पण ते बरेच वेळा पडून रहायचे.त्यातच त्यांना आजार जडला.त्यांचा उपचार होऊ शकला नाही.आणि उपचारा अभावी त्यांचा मृत्यू झाला असावा भुकेमुळे नाही.

*गावकऱ्यांचे होते सहकार्य*

समाजसेवक संदीप मावलीकर यांनी दोघी मायलेकीला बँक पास बुक,आधार कार्ड,मतदान कार्ड बनवून दिले.संजय गांधी निराधार योजनेतून त्यांचे पोट भरत होते.6 वर्षांपूर्वी घरकुल योजनेतील घरही त्यांना मिळाले.अनेक वेळा गावकरी त्या दिसल्याकी पैसेही देत असत.अशी माहिती सरपंच लोहे यांनी दिली.

*पोलिसांचा तपास सुरू आहे…तुषार चव्हाण*

मागील 2 दिवसांपासून पोलीस अधीक्षक व प्रशासन या घटनेवर लक्ष केंद्रित करून आहेत.11 व 12 सप्टेंबर ला सर्व अधिकारी आले.घटनास्थळी अन्न आढळून आले.पण मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरच कळेल.तूर्तास पोलिसांचा तपास सुरू आहे,अशी प्रतिक्रिया कोठारीचे पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी दिली.

सुनील तायडे.                                      संपादक.                                  ९४२२१४००४५