नागभीड पोलिस स्टेशन जादूटोण्याचे फलक लावणारे पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे.

138

चंद्रपूर: 11 सप्टेंबर (सुनील तायडे )        नागभीड पोलिस विभागाद्वारे जादूटोणाविरोधी कायद्याचे आयोजन व जादूटोणा विरोधी कायद्याच्या फलकाचे अनावरण.*

नागभीड पोलिस विभागाद्वारे जादूटोणाविरोधी कायद्यावर मार्गदर्शनाचे आयोजन दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी पोलीस स्टेशन नागभीड च्या वतीने तालुक्यातील पोलीस पाटील, होमगार्ड यांच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन आणि जादूटोणा विरोधी कायदा याबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक प्रमोद मदामे हे होते. ऍड. गोविंद भेंडारकर यांनी जादूटोणा विरोधी कायदा यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. शशिकांत बांबोळे यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका विशद केली व सहप्रयोग कार्यक्रम सादर केला. तसेच डॉ. मनीषा बनवाडे यांनी आरोग्य विषयक अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी मान. सुधीर गिरडे सर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रवीण रामटेके यांनी केले.
कार्यक्रमासाठी नागभीड तालुक्‍यातील पोलीस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते
यावेळी जादूटोणा विरोधी कायदा पत्रकाचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये नागभीड पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याच्या फलकाचे अनावरण सुद्धा करण्यात आले. नागभीड पोलिस स्टेशन जादूटोण्याचे फलक लावणारे पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे.

सुनील तायडे