वरोरा नाका चौकात उड्डाण पुलाला कंटेनर धडकला, जीवित हानी टळली.

119

चंद्रपूर: 11 सप्टेंबर ( सुनील तायडे )

चंद्रपूर नागपूर रोडवर वरोरा नाका चौकात दुपारी 4. 30 वाजता उड्डाण पुलाखालून जात असता पुलाला जबर धडक बसल्याने ट्रक वरील कंटेनर वाहतुकीच्या रस्त्यावर कोसळल्याने एकच खळबळ उडाली.  सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना पटावर उड्डाण पुलाखालून किती उंची असलेले वाहन कोणताही अपघात न होता जाऊ शकेल या बाबत मार्गदर्शक सूचना वाहनचालकांसाठी देणे अत्यंत गरजेचे आहे. किंव्हा उड्डाण पुलआधी त्या उंचीचे प्रोटेक्शन बार असणे गरजेचे आहे. असे असतानाही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. अजूनही वेळ गेली नाही, नाहीतर मोठा अपघात होऊन  मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुनील तायडे