जुन्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या

115

 

चंद्रपुर : 11 सप्टेंबर ( सुनील तायडे )

  1. दिनांक 10 सप्टेंबर रोजी फिर्यादि सूरज सुमतकर याने लहान भाऊ काल पासून आरोपी संगम सागोरे रा. चंद्रपुर व शुभम साखरकर रा. तिरवंजा, ता. भद्रावती यांच्या सोबत गेला परंतु अजुनपर्यंत परतला नाही अशी तक्रार रामनगर पोलीस स्टेशन ला दिली.
    यावर रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना विचारपुस केली असता त्यांनी रामनगर हद्दीत  शव आढळले असे सांगितले यावर पोलिसांनी कसुन तपास केला असता आरोपींनी जुन्या वैमनस्यातुन काल तिरवंजा गावा वरुन तिघे ही सोबत चंद्रपुर ला आले सोबत एका बार मध्ये दारू प्याले व दारू सोबत घेऊन एका निर्जनस्थळी जाऊन मृतक संकेत च्या गळ्यावर, पाठीवर व छातिवर चाक़ूने वार करून खून केल्याचे कबुल केले.
    रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपिस अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस निरीक्षक मधूकर गीते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान करित आहेत.