चंद्रपूर: 10 सप्टेंबर ( सुनील तायडे )
शहरातील जवळपास सर्वच प्रभागातिल रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत, ठीक ठिकाणच्या रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे समजायला मार्ग नाही.
या विरोधात महानगर पालिका समोर व पालिकेत सुद्धा अनेक आंदोलने झालीत परंतु मनपा प्रशासनाने यावर अजुनपर्यंत तोड़गा काढून रस्ते सुधारले नाहीत.
हिच शहरातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन समाज सेवक भूषण फुसे यांनी काही दिवसांआधी स्वखर्चाने काही भागातील खड्डे बुजविले.
सोबतच ते इतरही समाज कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी दिव्यांग बाँधवाना आत्मनिर्भर करण्यास सहकार्य, तृतीय पंथीयांसाठी मदत, निराधारांना आधार असे अनेक समाजसेवेचे कार्य करीत असतात.
असाच आज गणेश चतुर्थी च्या शुभ पर्वावर रस्त्याच्या मुद्ध्याना घेऊन तुकुम परिसरातील शिवनेरी चौक व मातोश्री चौकात ट्रैक्टर भरून खड्यांत स्वखर्चाने व स्वता मेहनत करुन भरण भरून खड्डे बुजविले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या नेतृत्वात जागरूक नागरिक महेंद्र ठाकुर, अरविंदभाऊ धीमान, राहूल घडसे, वृक्षप्रेमी कुणाल चन्ने, आसिफ सय्यद, लोहित गोगोई व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला बघून स्थानिक नागरिकांत सर्वत्र चर्चेचा विषय होत आहे.
सुनील तायडे