जादुटोणा प्रकरणातील सर्व आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी.

136

चंद्रपूर, 4 सप्टेंबर: ( सुनील तायडे )

चंद्रपूर शहरातील भिवापूर प्रभागात जादूटोणा केल्याच्या आरोपावरून नारायण पडदेमवार परिवारातील चार सदस्यांवर हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, सहा आरोपींना शुक्रवारी उशीरा रात्री अटक केली. सर्व सहा आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शहरातील भिवापूर परिसरातील आरके चौकात नारायण पडदेमवार यांच्यासह त्यांच्या दोन मुली आणि एका अल्पवयीन मुलाला त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी लाठ्या, लाथा आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. आरोपी नातेवाईकांनी नारायण पडदेमवारआणि कुटुंबावर काळा जादू केल्याचा आरोप करीत आणि ह्यामुळे त्याचा भाऊ रामूला कर्करोग झाल्याचा संशय घेतला होता.

शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सुधाकर अंभोरे यांनी सांगितले की आशालू पडदेमवार, नरसिंह पडदेमवार , शिन्नू रादंडी, सपना पडदेमवार , मंगेश पडदेमवार आणि रवी आशावार या सहाही आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली. महाराष्ट्र प्रतिबंध आणि मानवी बलि निर्मूलन आणि इतर अमानुष, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळा जादू कायदा, 2013 आणि भारतीय दंड संहिता च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ह्या प्रकरणी सातवी एक एक अल्पवयीन मुलगी असल्याने तिला अद्याप अटक झालेली नाही.

शनिवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आणि या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेतले. ही घटना गर्दीच्या चौकात भर दिवसा घडली असल्याने परिसरातील कुठे सीसीटीव्ही फुटेज आले असल्याचेही पोलीस शोधत घेत आहे. आरोपीताना कुण्या बुवा किंवा तांत्रिकाने तर नारायण पडदेमवार कुटुंबाचे नाव काळा जादू करीत असल्याचे तर सांगितले नाही, असा संशय असून पोलीस या प्रकरणाचा या ह्या दिशेनीही तपास करीत आहेत.

सुनील तायडे                                            संपादक                                    ९४२२१४००४५