चंद्रपुर शहरातील कचरा व डेंग्यू विरोधात ढोल बजाओ आंदोलन.

144

चंद्रपूर : 4 सप्टेंबर ( सुनील तायडे )

समाजसेवक भूषण फुसे यांचे अनोखे आंदोलन

चंद्रपुर :- शहरात ठीक ठिकाणी घानीचे साम्राज्य पसरलेले आहे याकडे महानगर पालिका दुर्लक्ष करीत आहे.
शहरातले नागरिक महानगर पालिकाला कर भरतात यावर मनपाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, परंतु यावर मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे असे निदर्शनास येत आहे.
यामुळे शहरा सह जिल्ह्यात डेंग्यू ची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.
या मुद्द्याला घेऊन आज समाजसेवक भूषण फुसे यांनी श्री टॉकीज चौकातील खोब्रागडे लेआउट येथील दुर्लक्षित रहिवासी यांना घरात येणे जाणे करण्यास मार्ग नाही, घरासमोर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
स्थानिक नगरसेवक, आमदार, मनपा यांना वारंवार निवेदनद्वारे मागणी करून सुद्धा तोड़गा न निघाल्याने नागरिकांनी समाजसेवक भूषण फुसे यांना संपर्क केला असता आज त्यांनी खोब्रागडे लेआउट पासून श्री टॉकीज पर्यंत ढोल वाजवत प्रषासना विरुद्ध ” मनपाचा टैक्स भरा.. डेंग्यू ने मरा”, “साम्राज्य कुणाचे घाणीचे, डेंग्यू चे” असे नारे देत प्रशासनाचा निषेध केला.
मनपा प्रशासनाने 7 दिवसात सकारात्मक कार्यवाही न केल्यास मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असा ईशारा समाजसेवक भूषण फुसे यांनी यावेळी दिला.
यावेळी भूषण फुसे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिक जावेद हकीम, शारिक हकीम, मिनाज सैय्यद, रियाज़ सैय्यद, राजू गनवीर, पियूष नगराले, शोएब शेख, नईमा हकीम, शाहिदा बेगम, वनिता गजघाटे, सुप्रिया गनवीर, सुनीता नगराले, सुजाता बहादे आदिंची उपस्थिति होती.

सुनिल तायडे                                        संपादक                                    ९४२२१४००४५