चंद्रपूर: 1 सप्टेंबर ( सुनील तायडे ) जिवती येथील काळी जादू प्रकरणाची दहशत कायम असतानाच पुन्हा एकदा नागभीड तालुक्यात अंधश्रद्धेपोटी अशोक कामटे याला काळी जादू करीत असल्याच्या संशयावरून बॅट व बांबूच्या का जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेपोटी घडणाऱ्या मारहाणीच्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते अक्षरशः हतबल ठरले आहेत.
नागभीड तालुक्यातील मिंदाळl (टोली) रहिवासी अशोक कामटे याच्यावर काळी जादू केल्याचा संशय होता. सर्व आरोपींनी मंगळवारी दुपारी अशोकच्या घरी जाऊन बहिण यशोदा ला मारहाण केली. त्यादिवशी या प्रकरणाची तक्रार करण्याकरता यशोदा ला कोणतेही साधन उपलब्ध न झाल्याने आई इंदिराबाई ने दुसऱ्या दिवशी बुधवारी नागभीड पोलिस स्टेशन गाठून प्रमोद सदमके, सिताराम सदमके, मयुरी सदमकें व मयुरीच्या आई विरुद्ध अंधश्रद्धेपोटी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक कामठे हा आपल्या मोटरसायकलने नागभिड येथे जात असताना पाठलाग करून त्याच्या मोटरसायकल सह जबरदस्तीने मिंधला येथे आणून सार्वजनिक पाण्याच्या लोखंडी खांबाला बांधून क्रिकेट बॅट व बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत अशोक कामटे गंभीर जखमी झाला.
नागभीड पोलिसांनी तक्रारीच्या आधारावरून भादवी च्या कलम 143, 147, 148, 149, 452, 324, 342, 363, 368, 323 आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम 3(1) (2) अन्वये पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
सुनील तायडे
संपादक
९४२२१४००४५