रुग्णांच्या मदतीला धावले महावितरणचे टाउन १ फिडर
महावितरणचे अथक परिश्रम, वीजपुरवठा एक्सप्रेस फिडर वर बहाल
चंद्रपूर: जिल्हा समान्य रुग्णालयाचा वीजपुरवठा दिनांक ३० ऑगस्ट रोजी जिल्हा समान्य रूग्णालयाद्वारे अंतर्गत खोदकाम जेसीबीने सुरु असतांना, महावितरणद्वारा जिल्हा सामान्य रुग्णालयास वीजपुरवठा करणारी भुमिगत वीजवाहिनी जेसीबी द्वारा तुटली.जिल्हा सामान्य रुग्णालय हे महावितरणचे उच्चदाब ग्राहक असून त्यांना एक्सप्रेस फिडरद्वारा वीजपुरवठा करण्यात येतो. रुग्णालयाची वीज गेला असता एक्सप्रेस फिडसमध्ये वीजपुरवठा ख्ंडीत झाल्याचे दिसले. यावर कार्यकारी अभियंता श्री. उदय फरासखनेवाला, उपकार्यकारी अभियंता श्री. वसंत हेडाऊ व हॉस्पिटल शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता यांनी पाहणी केला असता, जेसीबीने भुमिगत वाहिनी खोदकाम करीत असतांना जबरदस्त मार लागून तुटल्याचे लक्षात आले.
परंतु भुमिगत वाहिनी खोदून बाहेर काढणे व दुरूस्तीचे प्रयत्न करणे व पर्यायी वीजपुरवठा सुरू करणे या कामात साडे तीन तास गेले. या साडे तीन तासात महावितरण अभियंता व कर्मचारी यांना चांगलीच कसरत करावी लागली. झाड तोडणे, एरिया आयसोलेट करणे व नवीन उपरी विजवाहिनीद्वारे विजपुरवठा पूर्ववत करण्यात रुग्णांना 3 तास विजेशिवाय राहावे लागले.तुटलेली भूमिगत वाहिणी तात्काळ बदलविणे शक्य नसल्याने महावितरणने टाउन १ फिडरवरुन पर्यायी वीजपुरवठा रुग्णालयास सुरू करून देत रुग्णांना दिलासा दिला.
दुसरया दिवशी म्हणजे ३१ ऑगस्टला नागपूरवरुन आलेल्या चमुसोबत महावितरण कर्मचारी यांनी सकाळपासुन कामास सुरुवात करून भूमिगत २० मीटर भूमिगत वाहिणी जोडून बिघाड दुरुस्त केला. दुपारी मुसळधार झालेल्या पावसातही भूमिगत वाहिणी जोडण्याचे काम सुरु होते. आज दिनांक १ सप्टेंबर रोजी काम सुरु होते व दुपारी अडीच वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वीजपुरवठा टाउुन १ फिडर वरुन सामान्य रुग्णालयाच्या एक्सप्रेस फिडर वर बहाल करण्यात आला. या काळात टाउुन १ फिडर वरुन सामान्य रुग्णालयाचा वीजपुरवठा सुरू असतांना वीजपुरवठयात व्यत्यय येवू नये व रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून लक्ष ठेवूण होते.
एकस्प्रेस फिडर व भुमिगत वाहिणी ही विनाव्यत्यय सुरक्षित वीजपुरवठयाच्या दृष्टीने सुरक्षित असते. रुग्णालये, मोठया आस्थापणा जेथे वीजपुरवठा अत्यंत आवश्यक असतो अशा ठिकाणी एकस्प्रेस फिडरद्वारा वीजपुरवठा करण्यात येतो. अशा ठिकाणी वीजपुरवठयासाठी टाकलेली भुमिगत वाहिणी योग्य ती काळजी घेवून ४ ते ६ फुट जमीनीत पुरून रेती व आरसीसी पाईपच्या व नंतर माती टाकुन सुरक्षित करण्यात येते. परंतु अनेकदा खोदकाम करीत असतांना भूमिगत वाहीणीकडे लक्ष दिल्या जात नाही व जेसीबीद्वारा खोदकाम करीत असतांना योग्य खबरदारी घेण्यात येत नाही.
नंकतेच आझाद गार्डनच्या आतील परिसरात जेसीबीद्वारा केबल तोडल्या गेला हेाती त्यामुळे आसपासचा परिसर बराच वेळ अंधारात गेला हेाता व महावितरणच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागला हेाता.