अहेरी पोलिसांनी दोन बुकीना घेतले ताब्यात…

303

 

 

आसिफ पोहा व आशीष यांना मध्यरात्री उचलले….

 

सुशांत घाटे

चंद्रपूर- अहेरी पोलिसांनी आष्टी येथे उघडकीस आणलेल्या ऑनलाइन सट्टा रॅकेट प्रकरणी पोलिसांनी दोन बुकींना चंद्रपूर शहरातून सोमवारी मध्यरात्री अटक केल्याची बातमी समोर आली आहे.

जुलै महिन्याच्या शेवटी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलिसांनी ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दापाश केला.देशामध्ये ऑनलाईन जुगार प्रतिबंधित  असताना क्रिकेट बेटिंग साईटवर ऑनलाइन क्रिकेट व पत्यांचा जुगार खेळला जातो.करोडो रुपयांची या साईटवर दिवसाला उलाढाल होत असते. क्रिकेटचे ऍप बनवून त्याची लिंक बुकी एजेंट मार्फत ग्राहका पर्यन्त पोचवतात. अगदी ATM सारखे युजर आयडी व पासवर्ड देऊन त्या मध्ये पैसाचा भरणा केला जातो .

 

याच माहितीच्या आधारे अहेरी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर व त्यांच्या टीमने गेल्या एक महिन्यापासून बुकी आणि एजेंटची धरपकड सुरू केली आहे .सुरवातीला 11आरोपी पकड न्यात अहेरी पोलिसांना यश आले आणि त्या आरोपींकडून प्राप्त माहिती आधारे पोलिसांना आणखी काही नाव गवसले. मात्र याची कल्पना बाकी बुकीना मिळाल्याने सर्वांनी आपले ठिकाण हलवले व त्या नंतर एकही आरोपी पोलिसांना गवसला नाही.

आरोपी ची लांबलचक लिस्ट कोर्टात सादर करत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी 25 हूंन अधिक आरोपी बनवले. आरोपींनी गडचिरोली न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला मात्र कोर्टनी सर्व आरोपींना कंडीशन बेल देत जामीन दिला. आठवड्यातून दोनदा या सर्व आरोपींना अहेरी येथे आपला हजेरी नोंदवावी लागत आहे. हीच कारवाई सुरू असताना अहेरी पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करीत चंद्रपुरातील दोन बुकीना पर्वा मध्य रात्री ताब्यात घेतले. आसिफ पोहा आणि आशीष नावाच्या या बुकीना ताब्यात घेत स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांचा तपास करीत आहे. विशेष म्हणजे सदर कारवाई करत असताना चंद्रपूर पोलिसांना साधी कल्पना सुद्धा अहेरी पोलिसांनी दिली नाही आहे.आणखी आरोपीची संख्या या प्रकरणात वाढणार असे समजतं आहे..या प्रकरणात 100हुंन अधिक नावाची यादी तयार असल्याची गुप्त चर्चा सुरू आहे.