चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखेने देशी कट्टा बाडगणाऱ्या एका व्यक्तीला गोपनीय माहितीच्या आधारे शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या मागिल टॉवर टेकडी परिसरातून शिफातीने जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक देशी बनावटीची पिस्तूल व चार जिवंत काडतूस जप्त केले आहे.
अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक 29 ऑगस्ट चे रात्रौदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे गस्तीवरील पथकास गोपनिय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाली की, सागर येलपावार, रा. भिवापुर वार्ड चंद्रपुर हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपुर चे मागील टॉवर टेकडी परिसरात देशी बनावटीचे अग्नीशस घेऊन फिरत आहे. अशी खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे गस्तीवरील पथक मिळालेल्या माहितीनुसार सदर तात्काळ ठिकाणी रवाना झाले. सदर ठिकाणी पोहचताच रात्रीचे 01.30 वाजताचे सुमारास एक इसम टॉवर टेकडीकडुन येणारे कच्च्या रोडने अंधारात एकटाच चालत येताना दिसला. त्याचा संशय वाटल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेऊन विचारपुस केली करता त्याने त्याचे नाव सागर संतोष येलपावार, वय 21 वर्षे, रा. महावीर नगर, भिवापुर वार्ड, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर असे सांगितले. त्याचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल(माऊझर) व चार जिवंत काडतुसे मिळुन आली. त्याचे अंदाजित मुल्य 32,000/- रुपये आहे. मिळालेले देशी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करुन आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 855/21 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर करीत आहे.
जुलै महिन्यात चंद्रपुर शहरात दिवसा गोळीबाराची घटना झाल्याने चंद्रपुर शहरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी चंद्रपुर शहरातील देशी-विदेशी कट्टे बाळगणाऱ्यांची गोपनिय माहिती घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री. बाळासाहेब खाडे, स.पो.नि. बोबडे, पो.उप.नि. सचिन गदादे, संदीप कापडे, पो. हवा. नितीन साळवे ब.नं. 254, प्रकाश बलकी ब.नं. 618, ना.पो.शि. सुभाष गोहोकार ब.नं. 814, पो. शि. मिलींद ब.नं. 620, सतिश बगमारे ब.नं. 1352, पो. शि. प्रमोद कोटनाके ब.नं. 2555. संजय वाढई ब.नं. 2435 यांनी केली आहे.